राज्यातील महायुतीचे सरकार लाडक्या बहिणीच्या बँक खात्या मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दीड हजार रुपये प्रमाणे पुढील दोन महिन्याचे सुद्धा पैसे जमा केले आहे
परंतु सदरचे सरकार हे निराधार योजने बरोबर श्रावण बाळ विधवा महिला अपंगाचे अनुदान गेल्या तीन महिन्या पासून रखडले हे सदरचे अनुदान कधी जमा करणार असा सवाल पात्र लाभार्थ्यांनी केला आहे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पुढे राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काढली व तिची अंमलबजावणी केली आहे
असली तरी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात गेल्या वर्षाचा पीक विमा अध्याप पडला नाही त्यांचे काय असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यातून केला जात आहे
राज्यात काही महिन्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अमलात आणून सदर लाडक्या बहिणीच्या मताचे परिवर्तन आपल्याच बाजूने झाले पाहिजे या मूळ हेतुने सदरची योजना काढली आहे
सरकार लाडक्या बहीण्याच्या बँक खात्यात पैसे टाकण्यात मग्न असले तरी मग निराधार योजने बरोबर श्रावण बाळ व अपंग पात्र लाभार्थ्यांचे अनुदान तीन महिन्याचे कधी जमा करणार ? असा सवाल ही लाभार्थ्यातून केला जात आहे

0 Comments