नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु मार्गांवर अनेक वेळा प्रवाशाच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाची बस सोडण्यात यावी म्हणून अनेक वेळा मागणी करण्यात आली होती
परंतु राज्य परिवाहन मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे अध्याप या मार्गावर बस चालू केली नाही परंतु नांदेड येथे मुख्यमंत्र्यांची सभा असल्यामुळे सदरच्या अधिकाऱ्यांनी सभेला जाण्यासाठी ह्या मार्गावर बस सोडली असल्याने वारे : राज्य परिवहन मंडळाचा अजेब कारभार असे सदरच्या जनतेसह प्रवाशातून बोलल्या जात आहे
मुख्यमंत्र्याच्या सभेसाठी महिला नेण्यासाठी बस सोडली जाते तर मग दैनदिन या मार्गांवर राज्य परिवहन मंडळाची बस का सोडली जात नाही अस संतप्त सवाल जनतेनी केला आहे
तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु मार्गांवर नांदेड ते धर्माबाद बस प्रवाशाच्या सोयीसाठी सोडण्यात यावी म्हणून भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांच्यासह गजानन पाटील चव्हाण यांनी अनेक वेळा राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्याकडे संपर्क करून बस सोडण्याची मागणी केली आहे
गेल्या अनेक वर्षा पासून या मार्गांवर चालू असलेली नांदेड ते धर्माबाद घुंगराळा बळेगाव रुई बु मार्गावरील बस सदरच्या राज्य परिवहन मंडळाच्या बेजबाबदार पणामुळे बंद करण्यात आली आहे
परंतु मुख्यमंत्र्यांच्या सभेला मात्र जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई रस्त्यावर बसल्यामुळे कमालीची चर्चा करण्यात येत आहे

0 Comments