Header Ads Widget

जिल्ह्यातील दुर्गा देवीचे शांततेत विसर्जन करावे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे दुर्गा मंडळाच्या अधिकारी व पदधिकाऱ्याना आवाहन !!

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील खेड्या पाड्यात गेल्या महिन्यात श्री मंगल मूर्तीची स्थापना करून मोठया शांततेत गणरायाचे विसर्जन करण्यात आले होते 

जिल्ह्यात व ग्रामीण भागात कुठे अनुचित प्रकार घडला नव्हता त्याच पद्धतीने दुर्गा देवीचे सुद्धा अतिशय शांततेत विसर्जन करावे असे दमदार आयपीएस अबिनाश कुमार यांनी म्हटले आहे 

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दुर्गा मंडळाच्या अधिकाऱ्याला व पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना केली की दुर्गा मातेचे विसर्जन करीत असताना पाण्याचा अंदाज पाहून मातेचे विसर्जन करावे जने करून कुठलाच अनुचित प्रकार घडता कामे असे ही आयपीएस कुमार म्हटले आहे 

दुर्गा मातेच्या विसर्जनाच्या वेळी कोणत्या ही छोट्या छोट्या लेकराला गोदावरी पात्र असो की पाझर तलाव असो अथवा मोठ्या खदानी असो या ठिकाणी नेऊ नये अशा ही महत्त्वाच्या सूचना दिले आहेत 

जिल्ह्यात त्याच प्रमाणे नऊ दिवस अतिशय विविध संस्कृतिक कार्यक्रमानी गजबजलेल्या दुर्गा देवीचे सुद्धा शांततेत विसर्जन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दुर्गा मंडळाच्या अधिकारी व पद अधिकाऱ्याना केले आहे 

जिल्ह्यातील दुर्गा देवीचे शांततेत विसर्जन करावे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे दुर्गा मंडळाच्या अधिकारी व पदधिकाऱ्याना आवाहन केले आहे 

Post a Comment

0 Comments