Header Ads Widget

सकल मराठा समाजाला आरक्षण सरकार देत नसल्याने सावरखेड येथील तरुण मराठा रमेश आनंदराव वानखेडे यांनी विद्युत तारेला धरून केली आत्महत्या !!

       माधव पवार 
राज्यातले तीन पक्षाचे दळभद्री सरकार गेल्या अनेक महिन्या पासून सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चाल ढकल करत असल्यामुळे व मराठा समाजाची दिशाभूल करत असल्यामुळे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आचार सहिंता लागण्या पूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे आत्महत्या केली आहे 

नायगाव तालुक्यातील मौजे सावरखेड येथील रहिवासी असलेले आनंदराव शामराव वानखेडे यांचा तरुण मुलगा मयत रमेश आनंदराव वानखेडे वय अंदाजे २५ वर्ष यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गावा अंतर्गत असलेल्या सावरखेड आंतरगाव रस्त्यावर असलेल्या विद्युत तारे धरून आत्महत्या केल्याची घटना दिनांक ७ ऑक्टॉबर २०२४ रोजी घडली आहे 

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शाहिद झालेल्या सावरखेड येथील मयत रमेश आनंदराव वानखेडे यांच्या कुटूंबियाचे सांत्वन करण्यासाठी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी भेट दिली असल्याचे समजते आहे  

नांदेड जिल्ह्याच्या नायागांव तालुक्यातील मौजे सावरखेड येथील रहिवासी असलेले आनंदराव शामराव वानखेडे यांचा तरुण मुलगा मयत रमेश आनंदराव वानखेडे यांनी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जीवाचे बलिदान दिले आहे 

नायागांव तालुक्यातील सावरखेड येथील मराठा तरुण मयत रमेश आनंदराव वानखेडे यांनी गेल्या दोन ते तीन दिवसा पूर्वी गावातील हनुमान मंदिराच्या पटांगणात शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा असून या पुतळ्या समोर सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे म्हणून घोषणा बाजी केली आहे 

तालुक्यातील सावरखेड येथील प्रतिष्ठीत व जेष्ठ मंडळीनी या संदर्भात मयत रमेश आनंदराव वानखेडे यांना समजावण्याचा प्रयत्न केला असला तरी अखेर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गावातील रस्त्यावर असलेल्या विद्युत खांबावर जाऊन घोषणा देत हात लावला असल्यामुळे या घटनेत तो मराठा तरुण आरक्षणासाठी शाहिद झाला आहे 

Post a Comment

0 Comments