Header Ads Widget

नायागांव विधानसभा मतदार संघात दोन माजी मंत्र्यात प्रचारा दरम्यान रंगणार कल की तुरा !! -

       माधव पवार 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर या दोन माजी  मंत्र्यात नांदेड लोकसभा पोट निवडणूक व नायगाव विधानसभा मतदार संघात उमेदवाराच्या प्रचारा दरम्यान चांगलाच कल की तुरा रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे 

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून भाजपा पक्षात प्रवेश केला तर माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपा पक्षातून काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश करून त्यांच्या सुनबाई डॉ. मीनल ताई खतगावकर यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवून दिली आहे 

खासदार अशोकराव चव्हाण यांनी नायगाव विधानसभा मतदार संघ असो कीं नांदेड लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक असो या सदरच्या प्रचारा दरम्यान या दोन्ही सख्या मेव्हण्या मध्ये चांगलीच राजकीय खडाजंगी होणार असल्याचे स्पष्ट चित्र आता पासून दिसून येत आहे 

नायागांव विधानसभा मतदार संघात दोन माजी मंत्र्यात  प्रचारा दरम्यान रंगणार कल की तुरा रंगणार असल्याचे आता पासूनच दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments