Header Ads Widget

बलांडया हातीच्या कानात मुंगी गेल्यास काय परिणाम होतो तसाच अनुभव विधानसभा निवडणुकीत दिसणार डॉ माधवराव विभुते

      माधव पवार 
जंगलात राहणाऱ्या बलांडया हातीच्या अंगात खूप मोठे बळ असते परंतु त्यांच्या कानात छोटीशी मुंगी गेल्यास काय परिणाम होतो तसाच अनुभव आता नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दिसणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडी कडून ज्यांनी अधिकृत उमेदवारी दाखल केले असे उमेदवार डॉ माधवराव विभुते यांनी म्हटले आहे 

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी डॉ माधवराव विभुते यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळवून या नायगाव मतदार संघाच्या निवडणूक रणसंग्रामात डॉ विभुते उतरले असून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा बहुजन समाज असल्याने त्यांच्या ताकतीवर माझी उमेदवारी दाखल केलो असल्याचे डॉ विभुते म्हणाले आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघात अनेक बलांडे उमेदवार आपली उमेदवारी दाखल केली परंतु मी एक जन सामान्य कुटुंबातील व्यक्ती असून ॲड वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख ॲड प्रकाशजी आंबेडकर यांचे विचारधारा पुढे नेण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी प्राप्त करून बहुजन समाजाच्या ताकदीवर माझी उमेदवारी दाखल केली असल्याचे डॉ.माधवराव विभुते यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments