Header Ads Widget

दलित कैवारीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ हनुमंते यांची काँग्रेस अनुसूचित जाती जमातीच्या नायगाव तालुका अध्यक्षपदी निवड !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायागांव येथील रहिवासी असलेले भूमिपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ता आणि दलित कैवारीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ हनुमंते यांची काँग्रेस अनुसूचित जाती जमातीच्या नायगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे 
जिल्हाच्या नायागांव बाजार येथील दलित कैवारीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ हनुमंते यांनी गेल्या कित्येक वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी उत्कृष्ट पणे आपली लेखणी चालवून जन सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे 

पत्रकारिका क्षेत्रात काम करीत असताना मोठया संकटाचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत सुद्धा दलित कैवारीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ अनुमंते यांनी आपली लेखणी निर्भीड पणे चालविली आहे 

दलित कैवारीचे संपादक प्रकाश हनुमंते यांची काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमातीच्या नायगाव तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे त्यांचे राजकीय सामाजिक विविध संघटनेसह विविध वर्तमान पत्रात काम करणाऱ्या पत्रकारा कडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे 




Post a Comment

0 Comments