Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघाकडे विविध पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष !!

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त राजकीय पुढारी असल्यामुळे सर्वच राजकीय पुढाऱ्यांचे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी लक्ष लागले असल्यामुळे चेर्चेला मोठे उदान आले आहे नायगाव विधानसभा मतदार संघ हा तीन तालुक्याचा म्हणजे नायगाव धर्माबाद उमरी अशा या तिन्ही तालुक्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांची संख्या जास्त झाल्याने राजकीय पक्षांना सुद्धा कोणत्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी असा त्यांच्या पुढे मोठा पेच निर्माण होत आहे 

नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यात विविध पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यानी सदरची निवडणूक लढविण्यासाठी पक्षा कडे तिकिटाची मागणी केली असली तरी सदरचा मतदार संघ विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे 

जसे राजकीय वर्तुळामध्ये राजकीय गणित बिघडले तशाच पद्धतीने नायगाव विधानसभा मतदार संघात सुद्धा पक्षांतर्गत राजकीय पुढाऱ्याचे गणित बिघडले असल्यामुळे त्याच धर्तीवर खेड्यापाड्यात सुद्धा गटागटात राजकारण झाल्याचे दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments