Header Ads Widget

शहरारातील चार दुकानाचे शर्टर वाकून चोरा कडून चोरीचा प्रयत्न

       नागोराव शिंदे 
हिमायतनगर शहरातील पोलीस स्टेशन परिसरात चार दुकान चे शटर वाकून इतर चार दुकानची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच चोरट्यांनी काल रात्री एक ते तीन वाजेच्या सुमारास या परिसरातील दुकानाचे शटर वाकून चोरी केल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे 

हिमायतनगर पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर ही चोरी झाल्याने शहरातील व्यापारी व परिसरातील नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे

सदरील ठाण्याच्या अंतर्गत पोलीसानी रात्रीची पोलीस गस्त वाढवून जन सामान्य माणसातील झालेले भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी प्रयत्न करावे कारण रात्री व बे रात्री होत असलेल्या चोरीला आळा बसेल अशी जनतेचे मत आहे 

रात्रीच्या वेळी मोकाट पणे फिरणाऱ्या लोकांवर ही नजर पोलिसाची असली पाहिजे कोण फिरतोय कोणत्या उद्देशाने फिरतोय यांची ही चौकशी करणे गरजेचे आहे 

Post a Comment

0 Comments