Header Ads Widget

नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी मांजरम व कोलंबी येथे घेतली शांतता कमिटीची बैठक !!

       माधव पवार 
नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दुरक्षेत्र मांजरम व मौजे कोलंबी येथे दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कार्यलयाचे सर्व पदाधिकारी सर्व गणेश मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी यांची ६ वाजून ४५ मिनिटानी व ८ वाजून ४५  वाजे पर्यंत सदरच्या शांतता कमीटीच्या बैठका नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी घेतली आहे 
       
तालुक्यातील नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी सदरच्या दोन्ही बैठकी मध्ये श्रीगणेश आगमनाच्या वेळी घ्यावयाची काळजी व सुरक्षितता तसेच गणेश विसर्जन व मिरवणूक संदर्भात योग्य त्या सूचना अतिशय महत्वाच्या पोनि कुंभार यांनी दिल्या आहेत  

नायगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एक गाव एक गणपती डॉल्बीमुक्त गणपती,पर्यावरण पूरक गणपती संकल्पना राबविणे बाबत सूचना देण्यात आल्या  आहेत 

तसेच गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या अनुषंगाने कोणता ही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेण्यासाठी कळविण्यात आले आहे.
      
सदर बैठकीमध्ये दुरुस्त मांजरम ७० ते ८० व मौजे कोलंबी येथे जवळ पास ५० ते ६० गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते सदरचे सार्वजनिक गणेशोत्सव व इतर सार्वजनिक शांततेत पार पाडावे असे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी आवाहन केले आहे

 

Post a Comment

0 Comments