Header Ads Widget

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने विशेष रूट मार्च काढून दिला जनतेला शांततेचा संदेश !!

        माधव पवार 
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने विशेष रूट मार्च काढून दिला जनतेला शांततेचा संदेश दिला आहे 

सध्याच्या परिस्थिती मध्ये श्री गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद हे धार्मिकी सण असल्यामुळे सदरच्या कार्यक्रमां मध्ये कुठे ही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संबंधित पोलीस ठाणे प्रमुखांना सूचना देण्यात आल्याची माहिती आहे 

नांदेड जिल्ह्याचे सुपर फास्ट पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी विशेष लक्ष दिले असल्यामुळे सर्वत्र शांततेचे वातावरण असून सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी कसल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून संबंधित ठाणे प्रमुखानी वेळीच पावबंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे 

सार्वजनिक गणेश उत्सव व ईद ए मिलाद असे धार्मिक सण काही दिवसात साजरे होत असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे सुपर फास्ट पोलीस अधीक्षक आयपीएस अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांस पतसंचालन काढण्यात असल्याचे छायाचित्र स्पष्ट दिसत आहे 

सदरच्या उत्साहा निमित्त सर्वाच धर्मातील बांधवांनी एकत्र येऊन सदरचे दोन्ही सण उत्साहात साजरे करावेत असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयपीएस अबिनाश कुमार यांनी नायगाव फास्ट न्यूज बोलताना सांगितले आहे 

सदरचे सण हे सार्वजनिक व धार्मिक आहेत या सणाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरा मध्ये स्वतः एक पोलीस ऑफिसर रूट मार्च मध्ये सहभाग घेऊन पोलीस अधिकाऱ्यांचे कर्तव्य काय असते असा संदेश जन सामान्य माणसा पर्यंत पोहोचण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहे

 शहरी भाग असो की ग्रामीण भागात जन सामान्य माणसाला कसल्याच प्रकारचा त्रास होता कामा नये अशा पद्धतीचा विचार करत संबंधित पोलीस ठाणे प्रमुखानी जनसामान्य माणसाच्या समस्या ऐकून घेऊन त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे ही पोलीस अधीक्षक आयपीएस अबिनाश कुमार यांनी सांगितले आहे

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने विशेष रूट मार्च काढून दिला जनतेला शांततेचा संदेश देण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments