Header Ads Widget

नांदेड जिल्हाचे सुपर फास्ट आयपीएस अबिनाश कुमार यांची माजी सरपंच गजानन पाटील शिंदे यांच्यासह पत्रकार माधव पवार यांच्या भेटी दरम्यान विशेष सत्कार !!

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे सुपर फास्ट पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे नायगाव तालुक्यातील रुई बु येथील माजी सरपंच गजानन पाटील शिंदे यांच्यासह पत्रकार माधव पवार गोविंदराव विठ्ठल पाटील शिंदे माधव व्यंकटी गंगागिरे प्रभाकर नामदेव जाधव यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन विषय सत्कार केला आहे

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांसाठी वेळातला वेळ काढून सन्मान पूर्वक पोलीस अधीक्षक कार्यालया मध्ये बोलून त्यांची समस्या ऐकून घेऊन विविध विषयावर चर्चा केली आहे

आज पर्यंतच्या कार्य काळात पोलीस अधीक्षक कार्यालया मध्ये कोणत्या ही पोलीस अधीक्षकांनी जनसामान्य माणसाला वेळ देत नव्हते आणि जन सामान्य माणसांच्या समस्या ऐकून घेतल्या नाहीत सदरील नांदेड जिल्ह्याचे सुपर फास्ट पोलीस अधीक्षक यांनी जन सामान्य माणसांचा सत्कार स्वीकारून पोलीस अधीक्षक कार्यालया मध्ये सन्मान पूर्वक बातचीत केली आहे

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात गुटखा बंदी केल्याच्या नंतर त्यांचे शहरी भागासह ग्रामीण भागात त्यांच्या कार्याचे कौतुक  केल्या जात आहे 

जिल्ह्याचा कारभार पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यावर असताना सुद्धा जन सामान्य माणसाच्या समस्या ऐकून घेत आहेत 

नांदेड जिल्हाचे सुपर फास्ट आयपीएस अबिनाश कुमार यांची माजी सरपंच गजानन पाटील शिंदे यांच्यासह पत्रकार माधव पवार यांच्या भेटी दरम्यान यावेळी विशेष सत्कार करण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments