नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन प्लस आउट अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना माली गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेशीत केल्या नुसार नायागांव पोलीसानी ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मांजरम येथील मंदिरारातील दान पेटी चोरी प्रकरणातील तीन आरोपीला जेरबंद करून त्यांच्या कडून १५ हाजर ३५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे
तालुक्यातील मांजरम हे गाव नायागांव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते येथील मंदिरातील दान पेटी कोणत्या तरी आज्ञात व्यक्तीने सदरची पेटी फोडून चोरी केली होती परंतु सदर चोरी प्रकरणातील तीन आरोपीला नायागांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या पोलीस पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी तीन आरोपीला ताब्यात घेतले आहे
सदरील गुन्ह्यांतील तपास नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश आम्रता पंडित हे करीत असून दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पंडित पोहेका बालाजी गुप्त एका गोपनीय माहिती गारा कडून खात्रीशीर माहिती मिळाल्या नुसार सदरील गुन्ह्यांतील तीन आरोपीला ताब्यात घेतले आहे
नांदेड जिल्हाचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार खंडेराय धरणे आप्पर पोलीस भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव नांदेड संकेत गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर यांच्या सुचनेनुसार सदरची कार्यवाई करण्यात आली आहे
नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पंडित, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमराव कदम पोहेका गणपत पेदे बाबुराव चरकुलवार पोहेका साई सांगवीकर बालाजी शिंदे बालाजी बामणे यांच्या पथकाने ही सदरची कामगिरी केली असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कौतुक केल्या जात आहे

0 Comments