Header Ads Widget

मा.भास्कररावाच्या काँग्रेस प्रवेशाने खळबळ : दोन माजी मंत्र्यात म्हणजे दाजी भाऊजीत चालणार आता विधानसभा निवडणुकीत जुगलबंदी !!

       माधव पवार 
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे लाडके भाऊजी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर याने मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश करून भारतीय जनता पार्टीला राम राम केला आहे 

येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये दोन माजी मंत्रात म्हणजे भास्करराव पाटील खतगावकर आणि अशोकराव चव्हाण यांच्यात चांगलीच जुगलबंदी होणार असल्याचे चित्र स्पष्ट आता पासून दिसत आहे 

माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भारतीय जनता पार्टीला राम राम ठोकला असल्यामुळे भारतीय जनता पार्टी मध्ये चांगलीच खिंडार पडली असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण आणि भास्करराव पाटील खतगावकर हे भारतीय जनता पार्टी मध्ये असतानाच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कमळाला कोमेजून हात वर केला आहे 

आता माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि भास्करराव पाटील खतगावकर यांच्यात आता चांगलाच कल की तुरा रंगणार असल्याचे जनसामान्य माणसातून बोलल्या जात आहे

मा.भास्करराव पाटील खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने खळबळ उडाली असून या पुढे दोन माजी मंत्र्यात म्हणजे दाजी भाऊजीत चालणार आता विधानसभा निवडणुकीत जुगलबंदी चांगलीच रंगणार आहे 

Post a Comment

0 Comments