राज्यातल्या राजकीय नेते मंडळीचे कधी पक्षांतर्गत पक्ष प्रवेश होतात हे जरी जन सामान्य माणसाला कळत नसले तरी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना धक्का देत माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून भारतीय जनता पार्टीला चांगलेच खिंडार पाडले आहे
मुंबई मध्ये झालेल्या काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळीच्या उपस्थिती मध्ये माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने चांगलेच वादळ उडाले असून खरे तर हा भारतीय जनता पार्टीला धक्का नसून तो खरा तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना धक्का बसला आहे
माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांचा भाजपा रामराम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुबंईत काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याने आता काँग्रेस पक्षांची फळी मजबूत होण्यासाठी काहीसा वेळ लागत नसल्याचे स्पष्ट चित्र माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या प्रवेशा वरून दिसून येत आहे
काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी व नायगाव विधानसभा मतदार संघात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ मीनलताई खतगावकर यांना सदरच्या मतदार संघात मिळवून घेण्यासाठी सदरचा काँग्रेस पक्ष प्रवेश झाला असल्याची जोरदार चर्चा चालू आहे

0 Comments