शासनाने गावकऱ्याना मुबलक पाणी मिळावे म्हणून हर घर नळ योजना काढली परंतु योजनेच्या नावाखाली नायागांव तालुक्यातील खेड्या पाड्यातील पूर्वी करण्यात आलेल्या सिमेंटचे रस्ते फोडून पाईप लाईन करत आहे
सदरची योजना नसलेली बरी म्हण्याची वेळ आता जन सामान्य माणसांवर आली आहे
तालुक्यातील रुई बु रुई परिसरासह तालुक्यात शासना कडून प्रत्येक ग्रामपंचायत कार्यलयाना एक ते दीड कोठी रुपये मंजूर करण्यात आले असले तरी गावांतर्गतचे सिमेंटचे रस्ते फोडून पाईप लाईन करत असल्यामुळे विकाचा बँड वाजला आहे
हर घर नळ योजना ही दीड कोठीची रस्ते मात्र कोठ्या वधिचे फोडून गावचा विकास झिरो वर येऊन ठेपला असल्यामुळे सिमेंट रस्ते फोडण्यात आलेले ते कधी करणार असा प्रश्न जन सामान्य माणसाला पडला आहे
सध्या भर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वाहने तर सोडाच परंतु माणसाला पायी चालता येत नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
नायगाव तालुक्यातील खेड्या पाड्यात एक ते दीड कोठीच्या कामासाठी कोठ्या वधिचे रस्ते फोडून विकासाची विल्हेवाट चांगलीच लागत आहे

0 Comments