Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी ५० हजार अनुदान द्यावे विश्वानाथ बडूरे यांची मागणी !!

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्यात सह नायगाव तालुक्यात मुसळधार पावसाने अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे महाराष्ट्र शासनानी शेतकऱ्याच्या थेट बांधावर जाऊन सरसकट पंचनामे करावे व नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान जाहीर करावे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वानाथ बडूरे यांनी केली आहे 

नायगाव तालुक्यात मुसळधार पावसाने  थैमान घातला असल्याने पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले शेतकरी राजा अगोदरच अडचणीत असताना शेतकऱ्यावर हे दुसरे संकट कोसळले असल्याचे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांनी म्हटले आहे 

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तलाठी व मंडळाधिकारी तहसीलदार यांनी पंचनामे करून शेतकऱ्याच्या बँक खात्या मध्ये सदरची रक्कम जमा करावी अशी मागणी होत आहे 

त्याच बरोबर गेल्या वर्षी अशाच पद्धतीचे प्रचंड नुकसान झाले असताना सुद्धा शेकडो शेतकऱ्यांना अनुदान अद्याप मिळाले नाही ते सुद्धा अनुदान तात्काळ जमा करावे अशी मागणी विश्वानाथ बडुरे यांनी केली आहे 





Post a Comment

0 Comments