Header Ads Widget

माजी मंत्री खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी सूनबाईसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदार संघ शर्थीने लढविणार !!

       माधव पवार 
राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांचे लाडके मेहुणे माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी राजकीय नाडी धरून नायागांव विधानसभा मतदार संघात सुनबाई डॉ मीनलताई खतगावकर यांच्यासाठी शर्थीने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे जवळ पास निश्चित झाले आहे 

राजकीय धाव पट्टीवर धावत असताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता आणि भाजपाचे काम चांगले केले आहे 

मा.अशोकराव चव्हाण यांचे लाडके दाजी भास्करराव पाटील खतगावकर सुद्धा भाजपात प्रवेश केला होता परंतु सध्याच्या परिस्थितीत विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे 

काँग्रेस पक्षा कडून प्रबळ दावेदार नसल्यामुळे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी त्यांच्या सूनबाई डॉ मीनलताई खतगावकर यांच्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विजयी प्राप्त करू शकतात ? यात शंका नाही असे स्पष्ट दिसून येत आहे 

माजी मंत्री खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी सूनबाईसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदार संघ शर्थीने लढविणार असल्याचे जवळ पास निश्चित ? झाले आहे 

Post a Comment

0 Comments