Header Ads Widget

नांदेडचे हाय पॉवर दोन पोलीस अधिकारी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उतरले रस्त्यावर !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी गणेश उत्सवाच्या निमित्त बरोबर ईद ए मिलाद या धार्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कुठे ही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नांदेडचे दोन हाय पॉवर पोलीस अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरले आहे
जिल्ह्यात तीन ते चार दिवसां मध्ये श्री गणेशाचे विसर्जन होत असल्याने नांदेड जिल्ह्यात या सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठा खडक व बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती नांदेडचे सुपर फास्ट पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे श्री गणेश विसर्जनाच्या वेळी संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखांनी छोट्या छोट्या मुलांना पाझर तलाव असो गोदावरी नदी असो विहीर असो मोठ मोठाल्या खदानी असो या मध्ये पाण्याची पातळी खोल असल्यामुळे सदरचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी शक्यतो प्रयत्न करावे असे कुमार म्हणाले आहे 

जिल्ह्या मध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने मोठया प्रमाणात धुमधाम चालू असल्यामुळे काही ठिकाणी श्री गणेशाचे विसर्जन करण्यात येत असल्यामुळे छोट्या छोट्या मुलाच्या पालकांनी विसर्जनाच्या ठिकाणी जाऊ देऊ नये असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे 

नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार जिल्हाचे सुपर फास्ट पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी अतिशय उत्कृष्ट पणे काम करत असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे 






Post a Comment

0 Comments