Header Ads Widget

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या विशेष पथकाची दमदार कामगिरी : ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अग्नी शस्त्र व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोन आरोपीला केले जेरबंद !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या विशेष पथकानी दमदार कामगिरी केली असून सदरची कारवाई म्हणजे ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अग्नी शस्त्र व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोन आरोपीला केले जेरबंद केले आहे 
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात ऑपरेशन प्लश आउट अंतर्गत सदरील प्रकरणातील कार्यवाही चालू करण्यात आली असून त्या अनुषंगाने उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदार पोना अर्जुन मुंडे पोका चंद्रकांत स्वामी श्रीराम दासरे असे उपविभाग इतवारा पाहिजे फरारी मधील आरोपीचा शोध घेण्या कामी व अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात पेट्रोलिंग करीत होते नांदेड येथे दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती वरून पोलीस ठाणे ग्रामीण हद्दीत सावली ढाब्याच्या समोर दूध डेअरी रोडवर आरोपी बलबिरसिंघ प्रताप सिंघ जाधव वय २१ वर्ष व्यवसाय मजुरी राहणार गुरु रामदास यात्री निवास सी २५ नांदेड तर शेख आदिल शेख शकील वय २५ वर्ष व्यवसाय मजुरी राहणार मदिना मज्जीद जवळ रहीमपूर नांदेड या आरोपीला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात असलेले विना परवाना बेकायदेशीर बाळगलेले ३ गावठी पिस्टन व ४ जिवंत काडतुस किंमत ६४,००० रुपयाचा मु्देमाल जप्त करण्यात आला आहे 

सदरची कामगिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार आप्पर पोलीस अधीक्षक भोकर खंडेराय धरणे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव सुशीलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इतवारा येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदार अर्जुन मुंडे पोका चंद्रकांत स्वामी श्रीराम दासरे यांनी पार पाडली असून त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्या कडून त्याचे कौतुक करण्यात येत आहे




Post a Comment

0 Comments