नांदेड जिल्हाचे राजकारण पाहिले तर एक प्रकारचे विचित्र राजकारण असल्यामुळे नांदेड जिल्हाचे वैभव असलेले दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे काही दिवसा पूर्वी निधन झाले आहे
नांदेड जिल्हाची खासदारकीची जागा रिक्त झाली असल्यामुळे शेतकरी नेते कवळे गुरुजी व दिवंगत खासदार पुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्यात खरंच लोकसभा पोटनिवडणुकीत लढत होईल का? असा प्रश्न चर्चेला जात आहे
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शेतकरी नेते कवळे गुरुजी यांचे नाव सध्याच्या परिस्थितीत समोर आले तर सदरच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षा कडून दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण हे एकमेव काँग्रेस पक्षाचे आहेत
माजी मंत्री तथा खा. भास्करराव पाटील खतगावकर हे भाजपाला ? रामराम करून काँग्रेस पक्षात येण्याची शक्यता असल्यामुळे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा. रवींद्र पाटील यांच्यासाठी योग्य दिशा ठरणार आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर फार मोठा विश्वास ठेवून शेतकरी नेते कवळे गुरुजी आहेत
सदरचे नेते म्हणजे कवळे गुरुजी लोकसभा पोट निवडणुकीसाठी की नायगाव विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक लढवणार हा सुद्धा महत्वाचा प्रश्न चर्चेला जात आहे
शेतकरी नेते कवळे गुरुजी आणि दिवंगत खासदार पुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्यात लोकसभा पोटनिवडणुकीत खरंच लढत होईल का ? असा जनतेला प्रश्न पडला आहे

0 Comments