महाविकास आघाडीचे नांदेड जिल्ह्याचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण काँग्रेस पक्षाला मोठे बळ देऊन जनतेच्या आशीर्वादाने जिल्ह्याचे खासदार झाले आहेत
परंतु तसे नियतीला जमले नसल्याने लाखो लोकांचा चाहता जनते पासून हिरावून नेला असून त्यांचे सुपुत्र प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांना एकीकडे दुःख बाजूला ठेवून राजकारणात उतरावे लागणार आहे भारतीय जनता पार्टी मधून माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह त्यांच्या सुनबाई डॉ.मीनल ताई खतगावकर त्याच बरोबर विद्यमान दोन नामांकित पुढारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यात नव चैतन निर्माण झाल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याना वाऱ्यावर सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे
तशाच पद्धतीने माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीला जय श्रीराम करत काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेतला आहे
नांदेड जिल्ह्याचे खासदार दिवंगत वसंतराव पाटील चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकी मध्ये जनतेच्या आशीर्वादाने मोठे यश प्राप्त केले होते
परंतु त्यांच्यावर अचानक काळाने धाड घातल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शोक कळा पसरली होती
एकीकडे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे नव्हते निर्माण झाले तर दुसऱ्या बाजूने काँग्रेस पक्षाचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या दुःखाची जाणीव जन सामान्य माणसाला आहे

0 Comments