नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या रुई बु येथे बळेगाव मार्गावर असलेल्या ओढ्याला मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला असल्यामुळे ठाण्याचे सपोनि रामकृष्ण श्रीहरी पाटील यांनी सदरच्या पुराची पाहणी केली आहे तालुक्यात दिनांक १ सप्टेंबर २०२४ पासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती व रात्री रुई बु ते घुंगराळा बळेगाव मार्गावरून पाणी वाहात असल्यामुळे सदरचा मार्ग रात्रभर बंद अवस्थेत होता दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी पुर परिस्थिती कमी झाली आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण ४५ गावे असल्यामुळे सदरच्या गावातील नागरिकांना पुराचा व पावसाचा काही धोका निर्माण होऊ नये म्हणून कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि रामकृष्ण श्रीहरी पाटील यांच्यासह रुई बु बिटचे जमादार आर टी पवार व पोलीस जीप चालक तथा ए एस आय सदाशिव पाटील यांनी सदरची पाहणी केली आहे

0 Comments