Header Ads Widget

चारच तालुके नव्हे : नायगाव तालुक्यासह नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानी याची नोंद घ्यावी गजानन पाटील चव्हाण !!


        माधव पवार 
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये 31 दिनांक ३१ ऑगस्ट  २०२४ पासून नायगाव मतदार संघासह नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे 

जिल्हातील किनवट हादगाव हिमायतनगर माहूर सह नायगाव मतदार संघातील नायगाव उमरी धर्माबाद तसेच बिलोली मुखेड खंदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार होत  आहे
नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत साहेब यांनी दिलेल्या सूचने प्रमाणे त्या पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये नायगाव मतदारसंघांमध्ये नायगाव उमरी धर्माबाद बिलोली मुखेड अशा ठिकाणीही मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे

जिल्ह्यातील सर्वच मंडळांमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे  म्हणून मा जिल्हाधिकारी  साहेब यांनीं नायगाव बिलोली मुखेड धर्माबाद मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचे नुकसान होत आहे

घरपडी अनेक ठिकाणी झालेली आहे  म्हणून तात्काळ संबंधित विभागाशी येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता गजानन पाटील चव्हाण यांनी केली आहे 

मुसळधार पाऊस मोठ्या  आहे याचीही खबरदारी संबंधित सर्वच जिल्हा प्रशासनाने प्रशासनाने घ्यावीत अशी मागणी गजानन पाटील चव्हाण यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे

Post a Comment

0 Comments