Header Ads Widget

नायगावच्या तहसीलदाराच्या आदेशानुसार घुंगराळा मंडळ विभागातील पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या पिकाचे तलाठ्या मार्फत पंचनामे चालू !!

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील घुंगराळा मंडळ विभागातील रुई बु येथे नायागांवच्या महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांच्या आदेशानुसार रुई बु येथील महिला तलाठी सौ एस जी मॅकलवार यांनी थेट शेतकऱ्याच्या बांधवर जाऊन पाहणी करत पंचनामे केले आहे 

तालुक्यातील घुंगराळा मंडळ विभागात गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे नायागांव महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायवाड यांच्या आदेशानुसार रुई बु सज्जाच्या महिला तलाठी एस जी मॅकलवार ताई यांनी शेताचे पंचनामे केले आहे 

शासनाने शेतकऱ्याच्या पिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्याच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम तात्काळ जमा करावी तसेच भविष्यात पाऊस जर पडला तर सध्याच्या परिस्थितीत असलेले थोडे फार सोयाबीनचे पिक संपूर्ण वाया जाण्याची भीती शेतकऱ्यात निर्माण झाली आहे 

नायगावच्या तहसीलदाराच्या आदेशानुसार घुंगराळा मंडळ विभागातील पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या पिकाचे तलाठ्या मार्फत पंचनामे चालू करण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments