Header Ads Widget

भारतीय जनता पार्टी कडून कवळे गुरुजी खासदारकीसाठी दावेदार असतील तर मा. शिवराज पाटील होटाळकर यांचा नायगाव विधानसभा मतदार संघाचा मार्ग मोकळा ?

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक महिन्या पासून मोठे उधान आले असले तरी एकीकडे भारतीय जनता पार्टीचे शेतकरी नेते कवळे गुरुजी हे नायगाव विधानसभा मतदार संघाची जोरदार तयारी करत असताना अचानक काही तरी समोर आले आहे

नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी आता शेतकरी नेते कवळे गुरुजीचे नावं समोर आले म्हणे म्हणजे आता नायागांव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविणार नाहीत ? असा प्रश्न चर्चेला आहे 

जिल्ह्यातील नायागांव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अगोदरच दंड ठोकले आहेत 

लोकसभा पोट निवडणुकीसाठी शेतकरी नेते कवळे गुरुजी जर भारतीय जनता पार्टी कडून दावेदार असतील तर माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासाठी आता जवळ पास ? मार्ग मोकळा झाला असावा असा अंदाज लावला जात आहे 

भारतीय जनता पार्टी कडून शेतकरी नेते कवळे गुरुजी खासदारकीसाठी दावेदार असतील तर मा. शिवराज पाटील होटाळकर यांचा नायगाव विधानसभा मतदार संघाचा मार्ग मोकळा ? असल्याचे सांगण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments