नांदेड जिल्ह्याच्या नायगाव पोलीस ठाण्याचा पदभार नुकताच स्विकारलेले कर्तव्यदक्ष नूतन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी येत्या दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने नायगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या नायगाव शहरासह कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मंगलमूर्तीची स्थापना होणार असल्यामुळे सर्वत्र शांतता मय वातावरण ठेवणार आहेत
नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न करणार असल्याचे नूतन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी सांगितले आहे
नायगाव शहरासह ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ३० ते ३५ गावे असून या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गणेश उत्सवाच्या निमित्ताने काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याचे ही नूतन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी सांगितले आहे
पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत्या दोन दिवसात येणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने माझ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी माझ्यासह माझ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष राहणार असल्याचे सांगितले आहे
या सार्वजनिक उत्साहात कोणी हुलडबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची कसल्याच प्रकारची गैय केली जाणार नाही असा इशारा ही नूतन पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिला आहे

0 Comments