Header Ads Widget

पळसपुर हिमायतनगर चा संपर्क तुटला रस्त्यावरची वाहतूक खोळंबली रस्त्याच्या व पुलाच्या बांधकामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष

      नागोराव शिंदे 
हिमायतनगर तालुक्यामध्ये दिनांक ३१ रोजी च्या रात्री साडेअकरा वाजल्यापासून विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याने यामध्ये पळसपुर ते हिमायतनगर या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी असलेला रस्त्यावरचा मोठा नाला तुडुंब भरून वाहत असल्याने बराच वेळ ही वाहतूक ठप्प झाली असल्याने संपर्क तुटला आहे  या पुलाचे काम गेल्या तीन वर्षापासून गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे प्रलंबित असल्याने येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे वरिल पुलाचे बांधकाम का थांबले हे लोकप्रतिनिधी गुत्तेदार यांना का जाब विचारला जात नाही हे एक कोडेच आहे हे वृत्तलेपर्यंत वाहतूक सुरळीत झाली नव्हती या अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी असलेला रस्ता पावसामुळे रस्त्यावर पाणी आले असल्याने सकाळी दुध घेऊन जाणार्याना बराच वेळ ताटकळत बसावे लागले आहे

Post a Comment

0 Comments