Header Ads Widget

राज्य सरकारचा अंधाधुंद कारभार शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या " शेतकऱ्याकडे स्क्रीन टचचे मोबाईल नसल्यामुळे ई पीक पाहणी करणे शक्य झाले नसल्याने शेकडो शेतकरी मदती पासून वंचित !!

        माधव पवार 
शेतकऱ्याच्या हिताचे सरकार म्हणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यालाच विविध मदती पासून वंचित ठेवत असल्यामुळे सदरच्या शेतकऱ्यातून संतापाची लाट पसरली असल्याचे स्पष्ट  चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे 

सदरच्या राज्य सरकारच्या अंधाधुंद कारभार झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानीचे अनुदान त्याच बरोबर केवायसी झाले नसलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान व मुख्यमंत्री या योजनेचे हप्ते पडत नाही असे कसे हे शेतकऱ्याचे सरकार असा प्रश्न निर्माण झाला आहे 

सन २०२३ साली सरकारने शेतकऱ्यांना ई पीक पाणी करण्याचे आवाहन केले असले तरी शेतात राबराब काम करणाऱ्या शेतकऱ्याकडे स्क्रीन टचचे मोबाईल नसल्याने असंख्य शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता आली नाही व नेटवर्क नसल्यामुळे ई पीक पाहणी झाली नाही अशा अनेक तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वेळोवेळी अडचणीत सापडत आहे 

कृषी विभागा कडून शेतकऱ्यांना मिळत असलेली तुटपुंजी मदत ही सरसकट शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी केली जात असून शेतकऱ्याकडे सदरचे स्क्रीन टचचे मोबाईल नसल्यामुळे ई पीक पाहणी करणे शक्य होत नसल्याने शेकडो शेतकरी मदती पासून वंचित  राहत आहेत 

यासाठी सरकारने शेतकऱ्याचे गांभीरे लक्षात घेऊन कृषी विभागा कडून मिळत असलेली मदत सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करावेत अशी मागणी केली जात आहे 

Post a Comment

0 Comments