राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना मोठ्या थाटात काढली असली तरी सदरचे फॉर्म दाखल करण्यासाठी वेबसाईट चालत नसल्याने मोठा प्रॉब्लेम येत असून त्या वरच अवलंबून न राहता शासनाने ऑफलाइन पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म स्वीकारावे अशी मागणी केली जात आहे
सरकार निर्णय घेताना एकाच निर्णयावर अवलंबून राहत नाही तशाच पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म वेबसाईड ऑनलाईन बंद असल्यामुळे सदरचे फॉर्म दाखल करण्यासाठी लाडकी बहीण हैरान होताना दिसत आहे
सदरची वेबसाईट पाच पाच दिवस बंद असल्यामुळे ऑनलाइन फॉर्म दाखल होत नाहीत त्यासाठी सरकारने ऑफलाईन दाखल करून घेण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी केली जात आहे
येथे विधानसभेच्या निवडणुकी पूर्वी सदरची योजना काढण्यात आली असली तरी सदरच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिनीच्या बँक खात्यात पंधराशे रुपये थेट जमा करावेत ज्या ज्या लाडक्या बहिणीचे फॉर्म ऑनलाइन झालेत त्यांना त्यांच्या बँक खात्यात सदरचे दीड हजार रुपये तात्काळ जमा करावे अशी अपेक्षा या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून होत आहे

0 Comments