Header Ads Widget

जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर नांदेड येथे अभूतपूर्व अशा वैद्यकीय तपासणी शिबिर यशस्वी


राजकुमार पाटील मंगनाळे


नवोदय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड आणि नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी सहावी बॅच यांच्या नेतृत्वाखाली आज जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर नांदेड येथे अभूतपूर्व अशा वैद्यकीय तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 
        
नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री मांडले सर आणि नवोदय विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. सहाव्या बॅच चे प्रतिनिधी म्हणून  प्रा. डॉ. सचिन, डॉ पद्मा, डॉ. गिमेकर ,डॉ. बसवेश्वर. गणेश, पोफळे राजू, पौर्णिमा, अनिता, फरहीन फारूक, राजश्री, संजय कोंपलवाड,माधव सोरटे यांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन. 
             
या वैद्यकीय तपासणी शिबिराचे  आयोजन ज्या मान्यवर डॉक्टर्स मुळे अद्वितीय झाले त्यांचे विशेष आभार  , ज्यात प्रामुख्याने विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ  उमेश आत्राम सर, विभागप्रमुख मानसोपचारतज्ज्ञ वैद्यकीय महाविद्यालय नांदेड,  डॉ रोहित ठक्करवाड सर, सहारा neuropsychatric हॉस्पिटल नांदेड,  स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले

त्यात डॉ किरण गीते, डॉ सुप्रिया गोडघासे ,डॉ मादसवार मॅडम,  डॉ गुलाब वडजे ,हृदय आणि तत्सम बाबी साठी नवोदया  हॉस्पिटलचे डॉ श्याम दवने भैय्या आणि त्यांचे सहकारी ,  खास निजामबाद येथून आलेले डॉ महेंद्र भैय्या, देगलुर तेथील डॉ फरहीन मॅडम,  दंतरोग चिकित्सक म्हणून अद्वितीय कामगिरी करणाऱ्या मध्ये विशेष डॉ विवेक टापरे  सर ज्यांनी एक्सरे मशीन, तपासणी किट इत्यादी साहित्य स्वतः घेऊन आले

डॉ  बनसोडे सर  , प्रत्येक विद्यार्थी ,शिक्षक ,पालक यांची रक्त तपासणी करवून घेणार्‍या डॉ पद्मा दीदी आणि संपूर्ण सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करावे लागेल.  डॉ विवेक मोतेवार  भैय्या यांच्या हॉस्पिटल मधील सर्व  डॉक्टर्स आणि सहकारी यांनी सर्वाचे डोळे तपासणी करण्यासाठी  मशीन साहित्य आणि मेडिसिन उपलब्ध करून दिले.  हिमायतनगर  येथील सुप्रसिद्ध सर्जन डॉ शिवप्रसाद  तलपत्रे डॉ प्रेमकुमार वाघमारे यांनी विशेष उपस्थिती लावली

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा.डॉ चंद्रकांत बावीसकर सर, महेश स्वामी सर, अक्षय ढोके आणि साधना ढोके, श्री माधव मुसळे भैय्या यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. रामतीर्थ आरोग्य अधिकारी उज्वला डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिकलसेल आजाराची तपासणी करवून घेतली आणि विशेष सहकार्य केले. 
       
किमान ५० ते ६० हजारांचे अतिशय दर्जेदार प्रतीचे  मेडिसिन या आरोग्य तपासणी शिबिरात (माजी विद्यार्थी) यांच्या नवोदय विद्यालय बहुउद्देशिय समिती यांच्या मोफत वितरित करण्यात आले.



Post a Comment

0 Comments