नायगाव / वसमत:- तालुक्यातील येथील सिद्धेश्वर महाविद्यालय हट्टा येथे बायोस्टॅड इंडिया लिमिटेड मुंबई या कंपनीतर्फे बायोझाईम प्रगती शिष्यवृत्ती वितरण करण्यात आली बायोस्टॅड इंडिया लिमिटेड कंपनी भारतातील कृषी क्षेत्रातील अग्रगणे कंपनी आहे गेल्या ३८ वर्षापासून गुणवत्तापूर्ण दर्जेदार कृषी उत्पादने बाजारात देते आहे
बायोस्टॅड इंडिया लिमिटेड कंपनी प्रत्येक जिल्ह्यातील एक शाळा निवडुन त्या शाळेतील गरीब शेतकरी कुटुंबातील अभ्यासू होतकरू १० विद्यार्थी निवडून प्रत्येकी विद्यार्थ्यांना अडीच हजार रुपये शिष्यवृत्ती दर वर्षी वाटप करते आहे
हिंगोली जिल्हातील बसमत तालुक्यातील हट्टा येथील सिद्धेश्वर महाविद्यालय शाळेतील पूजा प्रकाश शेळके, नंदनी संतोष थोरवट, पुनम नंदकुमार मोहटे, मान्यता मारुती शिंदे, आरती प्रभाकर काळे, प्रियंका अनिल लोणकर, अपूर्वा जगुसिंग मेंडली, सार्थक केशवराव शिंदे, ऋषिकेश तुकाराम चाटे, ऋषिकेश माणिक काळे, सदरील विद्यार्थ्यांना शिष्यवृती व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळवंत गुजर सर. बसमत येथील बाहेती कृषी सेवा केंद्राचे संचालक मनमोहन बाहेती बायोस्टॅड इंडिया लिमिटेड कंपनीचे बिझनेस मॅनेजर निलेश हागे सर, टेरीटरी मैनेजर विजयकुमार जोरूळे सर, मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर किशोर ठाकरे
सर,अध्यक्ष बळवंत गुजर सर शाळेचे मुख्याध्यापक दीपक देशमुख सर, आदींची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसमत येथील कंपनी सेनगाव प्रतीनिधी हरिश्चंद्र घोंगडे आणि विश्वजीत बांगर, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजगुरू सर यांनी केले.
आणि बायोस्टॅड इंडिया लिमिटेड कंपनीतर्फे प्रगतिशील शेतकऱ्यांना कृषी सन्मान पुरस्कार देण्यात आला,कृषी सन्मान पुरस्कार प्राप्त हट्टा येथील प्रगतिशील शेतकरी.राजू रणजीत सिंह चंदेल,भागवत पंडितराव चव्हाण,शिवलिंग प्रल्हादराव पवार, सुरेश यादवराव खाडे, उद्धव माणिकराव देशमुख,माणिकराव माधवराव देशमुख,जयदीप बापूराव देशमुख आदींची उपस्थिती होती.

0 Comments