Header Ads Widget

मुख्यमंत्री लाडकी बहीण्याच्या योजनेसाठी बँकेत केवायसी करण्यासाठी अंगठा लागत नाही तर पंतप्रधान व मुख्यमंत्री नमो शेतकरी योजनेला अंगठा लावून केवायसी कशासाठी शेतकऱ्याचे हप्ते रोखून ठेवले सरकारचा अंदाधुंद कारभार !!

            माधव पवार 
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी बँकेत केवायसी करण्यासाठी सदरील महिलेचा अंगठा लागत नाही तर पंतप्रधान व मुख्यमंत्री नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनाच का ? जाचक आट्ट टाकण्यात आली हजारो शेतकऱ्याचे अंगठे येत नसल्यामुळे केवायसी होत नाही त्यासाठी शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेने प्रमाणेच फॉर्म भरून घेऊन केवायसी संबंधित अधिकाऱ्यानी करावी सरकारला फायदा होत असलेल्या ठिकाणी बँकेत फॉर्म भरून घेऊन केवायसी दोन मिनिटात केली जाते तर शेतकऱ्याचे अनेक पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेचे पडत नाहीत हे सरकार कधी कळणार म्हणे शेतकऱ्याचे सरकार सरकार हे शेतकऱ्याचा अंत पाहतो आहे 

वारे केंद्र सरकारचा राज्य सरकारचा अंदाधुंद कारभार सध्याच्या परिस्थित मुख्यमंत्री नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होत असताना शेकडो शेतकऱ्यांना मात्र या हप्त्या पासून बऱ्याच महिन्या पासून वंचित राहावे लागत असून सदरचे सरकार हे शेतकऱ्याचे डोळे पुसण्याचे काम करीत आहे 

मुख्यमंत्री लाडकी बहीण्याच्या योजनेसाठी बँकेत केवायसी करण्यासाठी अंगठा लागत नाही तर पंतप्रधान व मुख्यमंत्री नमो शेतकरी योजनेला मात्र अंगठा येत नसलेल्या शेतकऱ्याचे हप्ते रोखून ठेवले सरकारचा अंदाधुंद कारभार झाला असल्याचे दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments