नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते रुई बु बळेगाव मार्गे काही दिवसात म्हणजे चार ते पाच दिवसात सदरची राज्य परिवहन मंडळाची बस सेवा चालू करण्यात यावी म्हणून भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ता गजानन पाटील चव्हाण यांनी प्रयत्न केले आहे
बिलोलीचे आगार प्रमुख निम्मनवाड व वाहतूक निरीक्षक सोनटक्के यांनी सदरचा रस्ता गाडी सोडण्यासाठी सुरक्षित की असुरक्षित हे पाहणी करण्यासाठी सदरच्या अधिकाऱ्याना या मार्गांवर पाठविले आहे
नायागांव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु मार्गे बडापाड ते भोकर तसेच औराद ते भोकर धर्माबाद ते नांदेड नरसी ते उमरी अशा पद्धतीच्या राज्य परिवहन मंडळाच्या बसेच चालू होत्या परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गांवर बसेस अचानक बंद करण्यात आली होती
सदरच्या अधिकाऱ्यानी या मार्गांवर रस्ते ना दुरुस्त असल्यामुळे आज पर्यंत बस सेवा केली नव्हती परंतु बिलोली आगार प्रमुखानी या मार्गावर बस चालू करण्यासाठी रस्त्याची पाहणी दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी पाहणी केली आहे
माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह गजानन पाटील यांच्या प्रयत्नामुळे घुंगराळा ते रुई बळेगाव मार्गे बस सेवा चार दिवसात चालू होणार असल्यामुळे या मार्गांवरील प्रवाशाना व शाळेतील मुला मुलींना त्यांचा फायदा होणार आहे

0 Comments