Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांच्या दमदार नेतृत्वाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद !!

        माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या दमदार नेतृत्वाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून सदरच्या जन आशीर्वाद या यात्रेच्या निमित्ताने गावा गावात आशीर्वाद यात्रा फिरत असल्याने मा. होटाळकर यांना आशीर्वाद देण्यासाठी मतदार त्यांच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत 
सदरचा नायगाव विधानसभा मतदार संघ पिंजून काढण्यासाठी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे जन सामान्य माणसांचेेेे आशीर्वाद घेत आहेत सदरच्या मतदार संघात जन आशीर्वाद यात्रा मोठा जोमाने निघाली असल्याने माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या जन आशीर्वाद यात्रेला जनतेचा आशीर्वाद मिळत आहे 
नायगाव तालुक्यातील रुई बु. येथे काढण्यात आलेल्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने समस्त गावकऱ्यांसह
येथील दलित वस्तीचा मोठा पाठिंबा मिळाला असून काही महिन्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलताना मतदार मा.शिवराज पाटील साहेब आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत तुम्ही पुढे चला आम्ही मागे अहोत अशी गर्जना घोषणा देऊन सांगितले आहेत 

तालुक्यातील रुई येथे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने पत्रकार ढोलकी वादक माधव पवार यांच्यासह त्यांच्या गायन पार्टीतील हार्मोनियम मास्टर गणपत पिराजी पवार हार्मोनियम व गायक सुरेश कागडे गायक हनमंत वाघमारे गायक व हार्मोनियम माधव पाटील जाधव ईकळीकर यांनी गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता 

Post a Comment

0 Comments