Header Ads Widget

गोरोबा प्राथमिक शाळा कुंडलवाडी येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला गणवेश वाटपाच्या कार्यक्रमा बरोबर वृक्षारोपन !!


कुंडलवाडी : प्रतिनिधी :- 

शहरातील माचनूर कडे जाणार्‍या मार्गावर संत
गोरोबा प्राथमिक आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिना निमीत्य शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आणि वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला आवार्जून उपस्थिती होती 
शहरातील प्राथमिक आरोग्य केद्रांतील वैद्यकीय अधिकारी अनमलवाड सारिका, सोबत डॉ.सुनिल
वाडीकर, यांच्यासह शहरातील डॉ.लखमपूरे शहरातील नागरीक हणमंलू पाशावार, व्यापारी किशोर
गरुडकर, यांच्यासह आदी उपस्थित होते

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री संत
गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पुजन करूण दिप प्रज्वलीत करण्यात आले आणि मान्यवरांचे स्वागत स्वागत गीत चौडेकर मॅडम यांनी केले आहे 

सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षा, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सारिका अनमलवाड सारिका यांचे स्वागत शाळेतील चौडेकर जे.पी. मॅडम यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन केल,प्रमुख पाहुणे डॉ. हणमंत लखमपूरे यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक मठपती बी. एस. यांनी केले आहे 

डॉ. मिरदोडे यांचे स्वागत झेंडेकर
एल.एस. यांनी केले सहशिक्षक संतोष चौधरी सर , डॉ. सुनिल वाडीकरांचे स्वागत जडे डि.एस.यांच्या
सह हणमंलू पाशावार यांचे स्वागत संतोश चौधरी यांनी केल, आणि किशोर गरुडकर यांच स्वागत गायकवाड राम यांनी केल, यावेळी सन.१९९६ ला स्थापन झालेल्या या शाळेवर प्रास्ताविकातुन मुख्याध्यापक
मठपती यांनी सविस्तर प्रकाश टाकला. आज शाळेची भव्य इमारत आहे 

निसर्गरम्य वातावरण सर्व व्यवस्था आणि मुलांच्या अभ्यासावर लक्ष स्वादिष्ट् जेवण खेळातुन बुध्दीचा विकास मासिक परिक्षेतुन विद्यार्थ्यांच्या मुलांची शैक्षणिक प्रगती  झाली आहे 

यावर जातीने लक्ष दिले जाते. अशी सखोल माहिती उपस्थित मान्यवर व मुलांसमोर आपल्या सखोल मनोगतातुन व्यक्त केले आहे 

हर घर तिरंगा या कार्यक्रमा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले, हा कार्यक्रम बराच वेळ शांततेत चालला. शेवटीकार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार मठपती यांनी मानले. या संपुर्ण कार्यक्रमाच्या सुत्र संचालनाची जवाबदारी झेंडेकर सरांनी सांभाळली होती.

Post a Comment

0 Comments