Header Ads Widget

राजकीय गटबाजी बाजूला सारून राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार राजेश पवार शिवराज पाटील होटाळकर बालाजी बच्चेवार एकाच मंचावर !!

        माधव पवार 
भारतीय जनता पार्टी मध्ये होत असलेली गटबाजी बाजूला सारून राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर तसेच भारतीय जनता पार्टीचे तथा बरबडा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार एकाच मंचावर येऊन राजेश देशमुख कुंटूरकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत 

नायगाव विधानसभा मतदार संघा मध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये तगड्या पुढार्‍याचे गट पडले असल्यामुळे सभा मतदार संघात या नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार असो की भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर असो किंवा भारतीय जनता पार्टीचे बरबडा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार असो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये सोशियल मीडियावर मोठ्या झळकत आहेत 

भारतीय जनता पार्टीच्या गटबाजी मुळे या नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार त्याच बरोबर भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सदरच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत 

परंतु माजी मंत्री तथा खा.दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे चिरंजीव राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या ५१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सदरचे हे राजकीय पुढारी भाजपातील गटबाजी बाजूला सारून कुंटूरकरांना शुभेच्छा देण्यासाठी एकाच मंचावर आल्याचे दिसून आले आहे 

Post a Comment

0 Comments