Header Ads Widget

नांदेड लोकसभा मतदार संघांचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त हभप पुरुषोत्तम महाराज यांचा नायगावात भव्य कीर्तन सोहळा !!

        माधव पवार 
भारतीय स्वतंत्र दिनी म्हणजे येत्या दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी महाविकास आघाडीचे नांदेड लोकसभा मतदार संघांचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हभप पुरुषोत्तम महाराज यांच्या भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन नायागांव येथे करण्यात आले आहे 

नांदेड जिल्ह्यातील नायागांव येथील भूमिपुत्र तथा जिल्हाचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून असे भव्य कार्यक्रम नायगावकर आयोजित करतात त्यामुळे भव्य वाढदिवस साजरा होत आहे 

जिल्ह्यातील नायागांव नगरीचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले असल्यामुळे हभप पुरुषोत्तम महाराज यांच्या कीर्तन सोहळ्याने नायागांव नगरी येत्या स्वतंत्र दिनी फुलून निघणार आहे

नायागांव येथे सदरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यातील भाविक भक्तांनी सदरच्या कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे 

नांदेड लोकसभा मतदार संघांचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त हभप पुरुषोत्तम महाराज यांचा नायगावात भव्य कीर्तन सोहळा  आयोजित करण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments