Header Ads Widget

कुंटूरची जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्याच्या हितासाठी पूर्ण वेळ काम करते - आर्थिक व्यवहार सुरळीत !!

        माधव पवार 
नायागांव तालुक्यातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कुंटूर ही शेतकऱ्याच्या हितासाठी पूर्ण काम करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून या बँकेतील शासकीय अनुदान असो की पीक विमा असो की अंजुबन असो अथवा वसुली किंवा शेतकऱ्याची ठेवी असो याबाबतीत अतिशय सक्षम पणे काम करीत असल्यामुळे या बँकेत १७ गावच्या शेतकऱ्याचा भार आहे 

तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कुंटूर शाखेच्या संदर्भात तत्कालीन नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा सध्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी सदरील जिल्ह्यातील बँकेचा दर्जा सुधारण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते सध्याच्या परिस्थित या बँकेचे शाखा अधिकारी लांडगे यांनी योग्य पद्धतीने काम करीत असल्याचे वास्तव चित्र या बँकेत दिसून येत असून आर्थिक व्यवहार ही सुरळीत चालत आहे 

जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कुंटूर ही शेतकऱ्याच्या संदर्भात चांगले काम करीत असली तरी या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जर एटीएम दिले तर बँकेच्या कर्मचाऱ्यांवर येणारा लोड अर्थात ताण कमी होईल परंतु या बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी बाबीची गंभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना एटीएमचे तात्काळ वाटप केल्यास शेतकऱ्यांना वेळोवेळी बँकेत येण्याची अथवा जाण्याची गरज भासत नाही असे सदरच्या शेतकऱ्यातुन बोलल्या जात आहे

Post a Comment

0 Comments