Header Ads Widget

मा.शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी भगवानराव पाटील आलेगावकर यांची निवड झाल्याने विशेष सत्कार !!

        माधव पवार 
राज्यातले राजकारण एका झटक्यात बदलून टाकणारे  व हलविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे धुरंदर नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या गटाचे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे 

गेल्या सहा महिन्या पासून रिक्त असलेले नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पद मा.शरद चंद्रजी पवार यांच्या गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून भगवानराव पाटील आलेगावकर यांची निवड करण्यात आली आहे 

माजी मंत्री कमलकिशोरजी कदम माजी मंत्री व पक्ष निरीक्षक नांदेड राजेश टोपे नांदेड शहर जिल्हा अध्यक्ष डॉ सुनिलजी कदम जिल्हा सरचिटणीस प्रा. डी. भी.जाभरूनकर प्रदेश सरचिटणीस गजानन पापटवार जिल्हा महिला अध्यक्ष प्रांजली रावणगावकर बिलोली तालुका अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष गायकवाड यांनी सर्व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन भगवानराव पाटील आलेगावकर यांना जिल्हा अध्यक्ष पद देण्यासाठी पर्यंत केले आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांनी नूतन जिल्हा अध्यक्षांचा सत्कार केला आहे 

माजी मंत्री डॉ माधवराव पाटील किनाळकर य राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हा अध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी शरद चंद्रजी पवार यांच्या गटा मध्ये उत्कृष्ट पणे काम करीत असल्यामुळे त्यांची नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे 

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख मा.शरद पवार यांच्या गटाचे जिल्हा अध्यक्ष नांदेड भगवानराव पाटील आलेगावकर यांची निवड केली असल्याने यांचा सत्कार करते वेळस राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ दिगंबर पाटील बुडूरे राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्ष तालुका अध्यक्ष नायगाव व विधानसभा अध्यक्ष अंकुश पाटील रातोळीकर आदी यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments