नायगाव विधानसभा मतदार संघातील बरबडा सर्कल मधी भाजपाची फळी मजबूत करण्यासाठी व जनतेला विश्वासात घेऊन त्यांच्या आडी अडचणीचे व समस्याचे निवारण करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव तालुक्यातील वजीरगावात जन आशीर्वाद यात्रा घेऊन गेली या ठिकाणी ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे
तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद सर्कल हे जिल्हासह तालुक्यातील राजकीय पुढाऱ्याचे आवडते सर्कल असल्यामुळे अनेक राजकीय पुढारी याकडे जास्तीचे लक्ष देत असतात अशा सर्कल मधी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची जन आशीर्वाद यात्रा फिरत असल्यामुळे सदरच्या या विभागात पोषक वातावरण होताना दिसून येत आहे

0 Comments