Header Ads Widget

विधानसभेच्या निवडणुकीत मा. शिवराज पाटील होटाळकराची माघार नाहीच - निवडणूक लढविणारच !!

        माधव पवार
नायगाव विधानसभा मतदारसंघ म्हणजे जिल्ह्यातील व राज्यातील राजकीय पुढाराच्या दृष्टिकोनातून एक इंटरस्टिंग मतदार संघ असल्यामुळे या मतदार संघात सर्वच राजकीय पुढारी आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुक आहेत 

परंतु या मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जोरदार तयारी चालू केली आहे 

नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदार संघ हा अनेक समस्यांनी गांजला असताना सुद्धा या मतदार संघात येत्या आगामी काळातील नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी अनेक जन इच्छुक आहेत या मतदार संघाचा व खेड्या पाड्यातील अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचे राजकीय पुढाऱ्यांना ठरते परंतु कोणी भंडारे करण्यात मग्न आहेत 

नायगाव विधानसभा मतदार संघातून देवदर्शन करण्यासाठी जनतेला पाठवून देण्यात मग्न आहेत कोणी आप आपल्या पद्धतीने तर पक्षश्रेष्ठी कडे नायगाव विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी अंदर की बात या म्हणी प्रमाणे प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे 

भारतीय जनता पार्टीचे तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सदराच्या निवडणुकीत जंग पछाडण्यासाठी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जोरदार तयारीला लागले आहे 

सध्याच्या परिस्थिती मध्ये खेड्यापाड्यात जाऊन जनसामान्य माणसाच्या समस्या व संवाद साधत असल्याने येत्या निवडणुकी मध्ये कसल्याच प्रकारची माघार घेतली जाणार नाही असा ठाम सवाल होटाळकर यांनी केला आहे 


 

Post a Comment

0 Comments