Header Ads Widget

भावी आमदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत लोकनेते कै. बळवंतरावजी चव्हाण यांना पुष्पांजली अर्पण !!

        माधव पवार 
नायगावचे भूमिपुत्र तथा लोकनेते कै. बळवंतरावजी चव्हाण यांच्या सतराव्या पुण्यतिथी निमित्त नायगाव येथे भरगच्च कार्यक्रम घेण्यात आला यावेळी नायगाव विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील विशेष मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये कै.लोकनेते बळवंतरावजी चव्हाण यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आले आहेनांदेड जिल्हाची शान लोकनेते कै.बळवंतरावजी चव्हाण हे एक गरिबांचे नेते होते त्यांच्या कार्यकाळात जनसामान्य माणसाला घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे कै.बळवंतराव चव्हाण यांच्या सतराव्या पुण्यतिथी निमित्त नायगाव शहरामध्ये भरगच्च कार्यक्रम घेण्यात आला व पुष्पांजली अर्पण करण्यात आली आहे

सदरच्या कार्यक्रमाला केशवराव बळवंतराव चव्हाण नांदेड जिल्हाचे लाडके नेते तथा विद्यमान वसंतराव चव्हाण हणमंतराव बळवंतराव चव्हाण सुधाकर बळवंतराव चव्हाण आनंदराव शंकरराव चव्हाण श्रीनिवास व्यंकटराव चव्हाण,धनजंय शंकरराव चव्हाण,विजय शंकरराव चव्हाण,श्रीधर व्यंकटराव चव्हाण,डॉ. विश्वास व्यंकटराव चव्हाणसह सर्व चव्हाण परिवाराच्या वतीने वाहण्यात आली आहे 

नायगाव शहरांचे वैभव घडवून आणण्या मध्ये लोकनेते कै. बळवंतरावजी चव्हाण यांचा सिंहाचा वाटा असून अशा महान नेत्याला दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी नायगाव येथे राजकीय व सामाजिक या विशेष मान्य वरांच्या उपस्थिती मध्ये कै. चव्हाण यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments