नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी जनसामान्य माणसाच्या संपर्कात राहून जिल्हाचा कारभार सांभाळला होता त्यांच्या नंतर आलेले नांदेड जिल्ह्याला पोलीस अधीक्षक म्हणून जनसामान्य माणसाच्या संपर्कात आलेच नाहीत व त्यांचा फोन नंबर जनसामान्य माणसाला संपर्क करण्यासाठी मिळालाच नाही तत्कालीन पोलीस अध्यक्ष विठ्ठलराव जाधव यांनी पोलिसां बदल असलेली जनसामान्य माणसात भीती दूर करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे
तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याचा चांगल्या पद्धतीने पदभार हाताळला होता संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सुद्धा जनसामान्य माणसाची समस्या ऐकून घेत होते सध्याच्या परिस्थिती मध्ये जर पाहिजे तर जनसामान्य माणूस पोलीस ठाण्यात जाण्यासाठी धजावत नाही जर कोणता व्यक्ती पोलीस ठाण्यात गेला तरी संबंधित ठाणे प्रमुख व्यवस्थित बोलत नसल्याचे अनेक उदाहरण ग्रामीण भागात आहेत
पोलीस विभागात असताना तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी पोलीस मित्र सारख्या मोहीम काढली होती
संबंधित पोलीस ठाण्याच्या गावांतर्गत निर व्यसनी मुलांची नेमणूक करून त्यांना पोलीस मित्र असे ओळखपत्र देण्यात आले होते
तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील शाळेतील विद्यार्थ्यांना एका दिवसाचे ठाणे बहाल करून त्यांना सदरच्या पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळण्यासाठी महत्त्वाचा चान्स दिला होता हे मात्र सत्य आहे

0 Comments