तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील मा सरपंच तथा चेअरमन मा कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगर चे माजी सभापती पळसपुर नगरीचे भूमिपुत्र श्री डॉक्टर प्रकाश विठ्ठलराव वानखेडे यांची आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली त्यांच्या निवडीचे नुकतेच पत्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वाक्षरीनीशी देण्यात आले आहे डॉक्टर प्रकाश वानखेडे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर हिमायतनगर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्ष होत आहे आज दिनांक एक ऑगस्ट रोजी झालेल्या नांदेड जिल्हा काँग्रेसकमेटिच्या बैठकीमध्ये नांदेड जिल्हा अध्यक्ष बी आर कदम यांच्या स्वाक्षरीनिशी हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे निकटवर्ती कार्यकर्ते अत्यंत विश्वासू असे असलेले पळसपुर नगरिचे हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर प्रकाश वानखेडे पळसपुरकर यांची आज काँग्रेसच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यावेळी हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे यावेळी बालाजी चव्हाण कार्याध्यक्ष सुभाष राठोड किशोर पाटील तालुका अध्यक्ष हदगाव गजाननराव सूर्यवंशी तालुका अध्यक्ष हिमायतनगर जनार्दन ताडेवार कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगर सभापती शिवप्रसाद सूर्यवंशी हडसणीकर आम्हीं आरसूळ माजी नगराध्यक्ष बाला पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर प्रकाश वानखेडे यांना खऱ्या अर्थाने आज पक्षांमध्ये न्याय मिळाला असल्याचे पळसपुरवासीयातून बोलल्या जात आहे

0 Comments