नायगावच्या तहसील कार्यालयात प्रशासनातील कर्मचारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात व उत्पन्नाच्या प्रमाण पत्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी अख तहसील प्रशासन सदरच्या कामात व्यस्त असल्याचे स्पष्ट चित्र दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी दिसून आले आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी व सदरच्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शेकडोच्या संख्येने महिला वर्ग ऑनलाइन अर्ज दाखल केले असल्यामुळे सदरचे प्रशासन याच कामात हैराण असल्याचे दिसत असले तरी इतर शेतकऱ्यांचे छोटे मोठे खोंळबलेले कामे कधी होणार असा ही प्रश्न चर्चेला जात आहे
नायगाव तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अनेक गावात गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आणि शासनाने अनुदान ही जाहीर केले परंतु बऱ्याच पैकी शेतकऱ्याच्या हाताचे ठसे येत नसल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सदरची रक्कम जमा करण्यात आली नाही त्यामुळे शेतकरी हैराण आहेत
सदरच्या शेतकऱ्याच्या वारसाच्या नावे म्हणजे सदरची रक्कम बँक खात्यात वारसाच्या नावे जमा करण्यात यावे म्हणून ऑनलाईन तक्रार करण्यात आली आहे
नायगावच्या तहसीलदारासह कर्मचाऱ्यावर कामाचा प्रचंड लोड असल्याने व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी काही प्रमाणात लागणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना देण्यासाठी सदरचं तहसील प्रशासन सदरच्या कामात व्यस्त असल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले आहे

0 Comments