हिमायतनगर. तालुक्यातील मौजे एकंबा येथे आज सिकलसेल सोल्युबिलीटी कॅम्प येथे आज तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश पोहरे , वैद्यकिय अधिकारी डॉॅ. जर्नादन टारपे , तालुकास्तरीय तालुका सिकल सेल सहाय्यक श्री सुनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले
या कॅम्प मध्ये ० ते ४० वयोगटातील पुरुष व स्त्री यांची तपासणी करण्यात आली . सदर कॅम्प मध्ये तपासणी केलेली विद्यार्थी संख्या ११० होती सर्वाचे रक्त नमुने नकारात्मक आले सकारात्मक ची संख्या शुन्य होती.
आरोग्य मंदीर उपकेंद्र सिरंजनी येथिल आरोग्य सेविका श्रीमती लक्ष्मी निळकंठ तुप्तेवार ,आरोग्य सेवक श्री सय्यद ब्रदर , स्वंयसेवक खमरअली ब्रदर , अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती इंदुताई धनगे, आशा स्वंयसेविका श्रीमती सत्वशिला काळे व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी उपस्थीत राहुन सिकलसेल कॅम्प यशस्वी केला आहे

0 Comments