नायगाव विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर २१ जुलै २०२४ पासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली असल्यामुळे सदरचा नायगाव मतदार पिंजून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे शेकडो कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे स्पष्ट चित्र नायगाव विधानसभा मतदार संघात दिसून येत आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात जनसामान्य माणसाचा आशीर्वाद माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मिळत असल्याने सदरची ही यात्रा येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून सदरच्या आशीर्वाद यात्रेत सहभाग घेण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जुटले आहेत
भारतीय जनता पार्टी पक्षा मध्ये नायगाव विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी अनेक पुढाऱ्यांची अपेक्षा असली तरी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी मात्र पक्ष श्रेष्ठ वर विश्वास ठेवून नायगाव विधानसभा मतदार संघात जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शेतकऱ्या सह मतदार असो की जनसामान्य माणूस असो की कुठल्या ही क्षेत्रातील कार्यकर्ता असो त्यांच्या भेटी घाठी घेत असताना दिसून येत आहेत

0 Comments