नायगाव तालुक्यातील रुई बु व रुई परिसरात मोबाईल धारकाचे रिचार्ज वाढवून सुद्धा जीओ एअरटेला रेंज येत नसल्यामुळे या सदरच्या दोन्ही कंपनीचा निषेध करीत जनतेनी संताप व्यक्त केला आहे
सदरच्या ह्या दोन्ही कंपन्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट करून त्यांना सेवा देत नसल्याने सदरच्या मोबाईल धारकात संतापाची लाट पसरली आहे
तालुक्यातील गेल्या उन्हाळ्या मध्ये जिओ कंपनी धारकाने रुई बु. परिसरात येऊन अगोदरचे कस्टमर आयडिया कंपनीकडे होते त्या मोबाईल धारकांना जिओ कंपनीमध्ये येण्याचा आग्रह धरून सर्व कार्ड जिओ कंपनीकडे घेतले परंतु त्या जिओ कंपनीच्या टावरला व मोबाईलला रेंज नसल्याने सदरचे मोबाईल धारक कमालीचे वैतागले असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहेत
रुई बु.येथे गावा लगतच शेतात एअरटेलचे टॉवर बसविण्यात आले परंतु ह्या सुद्धा कंपनीने परिसरात तर सोडाच परंतु रुई बु येथील मोबाईल धारकांना रेंज मिळत नसल्यामुळे ग्राहक चांगले संतापले असून ग्राहकांची लूट करून रेंज न सोडणाऱ्या दोन्ही कंपन्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे
सदरची रेंज तात्काळ सोडा अन्यथा ग्राहकांना वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असे स्पष्ट ग्राहकासह जनतेतून बोलल्या जात आहे

0 Comments