Header Ads Widget

रुई बु येथे शेतातील आखाड्या वरून अज्ञात चोरट्यानी तीन शेळ्या चोरल्याची घटना !!

         माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या रुई बु.येथील शेतकरी किसन दिगंबरराव पाटील शिंदे यांच्या शेतातील आखाड्यावरून दिनांक १७ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी म्हणजेच बारा वाजण्याच्या दरम्यान कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने आखाड्याची कवाड तोडून तीन शेळ्या चोरल्याची घटना नुकतीच घडली आहे 

तालुक्यातील रुई बु. येथील शेतकरी किसनराव दिगंबर पाटील शिंदे यांचे शेत गावापासून एक किलोमीटर अंतरावर असल्यामुळे त्यांच्या शेतात गेल्या अनेक वर्षापासून जनावरे बांधण्यासाठी आखाडा करण्यात आला दिनांक १७ जुलै २०२४ रोजी सदरचे शेतकरी किसनराव दिगंबर शिंदे यांनी आखाड्यावर शेळ्या बांधून घरी आले होते 

रुई बु येथे हनुमान मंदिरात आकाडी एकादशी निमित्त भजन होते त्या भजनासाठी सदरचा शेतकरी किशनराव शिंदे यांनी पारावर आले होते शेतातील आकाड्या कोणी नसल्याची संधी घेऊन अज्ञात चोरटे शेतातील तीन शेळ्या चोरल्या असल्यामुळे शेतकऱ्यानी कुंटूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे समजते आहे

Post a Comment

0 Comments